बँक कर्मचारी चळवळीत बाळकृष्ण धायगुडे यांनी सांस्कृतिक आशय निर्मिती केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:15 AM2021-07-04T04:15:02+5:302021-07-04T04:15:02+5:30

स्टेट बँक ऑफ इंडियाची प्रदीर्घ सेवा बजावून बाळकृृष्ण धायगुडे सेवानिवृत्त झाले़ त्यानिमित्ताने बँकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कॉ़ कुलकर्णी ...

Balkrishna Dhayagude created cultural content in the Bank Employees Movement | बँक कर्मचारी चळवळीत बाळकृष्ण धायगुडे यांनी सांस्कृतिक आशय निर्मिती केली

बँक कर्मचारी चळवळीत बाळकृष्ण धायगुडे यांनी सांस्कृतिक आशय निर्मिती केली

Next

स्टेट बँक ऑफ इंडियाची प्रदीर्घ सेवा बजावून बाळकृृष्ण धायगुडे सेवानिवृत्त झाले़ त्यानिमित्ताने बँकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कॉ़ कुलकर्णी बोलत होते़ यावेळी शाखाधिकारी अरविंद वाघमारे, प्रफुल्ल वाघमारे, बँक अधिकारी, कर्मचारी संघटनेचे नेते राजेंद्र दरेकर, आऱ बी़ इबुतवार, अंजली स्वामी, उमेश कामशेट्टी, प्रशांत धामणगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती़

३५ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणारे बाळकृष्ण धायगुडे हे पुरोगामी विचारांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून बहारदार सूत्रसंचालन ही त्यांची ख्याती आहे़ सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमात बँकेच्या वतीने भेटवस्तू देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला़

कार्यक्रमास अ‍ॅड. उदय गवारे, प्रा़ सुधीर अनवले, प्रा़ डॉ़ शिवाजी जवळगेकर, कॉ़ उत्तम होळीकर, दीपक माने, उदय मोरे, प्रदीप भोकरे, रवि आघाव, निर्भय कोरे, दिलीप सोरडगे, नागसेन कामेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रास्ताविक शााखाधिकारी अरविंद वाघमारे यांनी केले़ सूत्रसंचालन अर्चना कसबे तर हेमंत हिरे यांनी आभार मानले़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी लांडगे, कविता सरातीया, विनय पााटील, वर्षा कोकाटे, खंडू बागल, महालिंग स्वामी, पुष्पा गरड यांनी सहकार्य केले़

कॅप्शन : स्टेट बँक ऑफ इंडियातून प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल बाळकृष्ण धायगुडे यांचा बँकेत सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे अधिकारी, कर्मचारी.

फाईल नेम : ०३ धायगुडे डीएलफोटो

Web Title: Balkrishna Dhayagude created cultural content in the Bank Employees Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.