राशनच्या कारणावरून एकास मारहाण
लातूर : घराच्या बाहेर बोलावून तू राशन मागणारा कोण, तुझे आमच्याकडे राशन नाही, तू कसा काय मागितलास असे म्हणून शिवीगाळ करून कपाळावर दगडाने मारून जखमी केले. तसेच हातातील काठीने फिर्यादीच्या पायाच्या पिंढरीवर मारून जखमी केले. या प्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
फिर्यादी आत्माराम पंढरीनाथ भांगे यांना मारहाण झाल्याची घटना १२ मे रोजी घडली. भांडण सोडविण्यासाठी त्यांची पत्नी गेली असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. तहसीलदारांकडे आमची तक्रार केल्यास खतम करून टाकतो म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आत्माराम भांगे यांच्या तक्रारीवरून नामदेव गंगाधर भांगे व सोबत असलेल्या तिघांविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोहेकॉ. नागरगोजे करीत आहेत.
बांधकामाच्या पैशावरून एकास मारहाण
लातूर : तू सामाईक भिंत बांधकाम केल्याचे माझे पैसे का दिले नाहीत, या कारणावरून मारहाण केल्याची घटना भाडगाव येथे घडली. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी लक्ष्मण भगवानराव सिंदाळकर यांना ‘तू सामाईक भिंत बांधकाम केल्याचे माझे पैसे का दिले नाहीत’ या कारणावरून डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी लक्ष्मण सिंदाळकर यांच्या तक्रारीवरून दयानंद अंगद जगताप व सोबत असलेल्या एकाविरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोफौ. येरबागे करीत आहेत.