कोरोनाच्या संकटामुळे शासनाच्या नियमांचे पालन करीत जळकोट शहरात जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती शुक्रवारी घरोघरी साजरी करण्यात आली.
जळकोटातील महात्मा बसवेश्वर चौकात लिंगायत समाजाचे अध्यक्ष माधव धुळशेट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी दापकेकर महाराज, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथअप्पा किडे, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, जि.प. गटनेते संतोष तिडके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारोती पांडे, शहराध्यक्ष महेश धुळशेटे, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांची उपस्थिती होती. जळकोट दौऱ्यादरम्यान राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
तद्नंतर माजी नगराध्यक्ष किशन धुळशेट्टे, चंदन पाटील, रामराव सोनटक्के, प्रशांत देवशेट्टे, अर्जुन आगलावे, बालाजी केंद्रे, अर्जुन वाघमारे, सुभाष धुळशेट्टे, प्राचार्य दत्तात्रय ह्मपल्ले, पत्रकार माधव होनराव, प्रा. माधव मरशिवणे, गोविंद भ्रमणा, सोसायटीचे संचालक शंकर धुळशेट्टे, अनंत सिध्देश्वरे, देवानंद देवशेट्टे, श्याम डांगे, ॲड. तात्या पाटील, कृष्णा गबाळे, सुभाष बनसोडे, प्रदीप काळे, बसव ब्रिगेडचे नितीन धुळशेट्टे, अक्षय काळे, गणेश माळवदे, बसवेश्वर सोनटक्के, सुधाकर बुके आदींनी फिजिकल डिस्टन्स राखत अभिवादन केले.
तसेच तालुक्यातील वांजरवाडा, होकर्णा, चेरा, केकतसिंदगी, जगळपूर, कुणकी, करंजी, पाटोदा, कोळनूर, बेळसांगवी, लाळी, रावणकोळा, डोंगरकोनाळी, सुल्लाळी, अतनूर, घोणसी, तिरूका येथेही महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी गणपत धुळशेट्टे, सभापती बालाजी ताकबिडे, अरविंद नागरगोजे, विठ्ठल चव्हाण, डॉ. काळे, सोमेश्वर सोप्पा, बाबूराव जाधव, महेताब बेग, शिरीष चव्हाण, सरपंच अविनाश नळदवार, सत्यवान दळवे, मंगेश हुंडेकर, सिध्दार्थ सूर्यवंशी, सत्यवान पांडे, प्रा. गजेंद्र किडे, संग्राम कदम, बसवंत काळे, दत्तात्रय बोधले, रामराव होनराव, मारोती ताकबिडे, गोविंद बनाळे, सुधाकर सोनकांबळे, सरपंच सावरगावे आदींनी घरीच जयंती साजरी केली.