उदगीर येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:18 AM2021-05-15T04:18:30+5:302021-05-15T04:18:30+5:30
सकाळी रेल्वे स्टेशनसमोरील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे, प्रमोद शेटकार, उत्तरा कलबुर्गे यांच्या हस्ते करण्यात ...
सकाळी रेल्वे स्टेशनसमोरील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे, प्रमोद शेटकार, उत्तरा कलबुर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, सभापती मुन्ना पाटील, सुभाष धनुरे, राम मोतीपवळे, रवी हसरगुंडे, बाबुराव पांढरे, वैजापूरे मित्रमंडळाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, पोलीस उपअधीक्षक डॅनियल बेन, तहसीलदार रामेश्वर गोरे, पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, चंदन पाटील नागराळकर, सभापती शिवाजी मुळे, विवेक सुकणे, बापूराव राठोड, गोपाळ घोडके, ॲड. दत्ता पाटील, मनोज पुदाले, विक्रांत भोसले, गणेश गायकवाड, पप्पू गायकवाड, अमोल निडवदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, विजय निटुरे, शिवसेनेचे श्रीमंत सोनाळे, चंद्रकांत टेंगेटोल, गजानन सताळकर, बाबूराव झुल्पे, शिवकुमार उप्परबावडे, चनबसप्पा वगदाळे, बाबूराव समगे, संगम महाजन, रेखा कानमंदे, बबिता पांढरे, मंदाकिनी जीवने, मधुमती कनशेट्टे, गुरुप्रसाद पांढरे, बबिता भोसले आदींनी पालिकेसमोरील महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती संभाजी महाराज जयंती, रमजान ईद, महात्मा बसवेश्वर जयंती, अक्षय्य तृतीया, परशुराम जयंतीनिमित्त पालिकेच्या वतीने शहरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.