खंडाळीत चुरशीची लढत, २६ उमेदवार रिंगणात ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:16 AM2021-01-14T04:16:45+5:302021-01-14T04:16:45+5:30

खंडाळी : अहमदपूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या खंडाळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी राेजी मतदान होत आहे. येथील उमेदवारांनी भेटीगाठीवर भर ...

Churashi battle in Khandali, 26 candidates in the fray. | खंडाळीत चुरशीची लढत, २६ उमेदवार रिंगणात ।

खंडाळीत चुरशीची लढत, २६ उमेदवार रिंगणात ।

Next

खंडाळी : अहमदपूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या खंडाळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी राेजी मतदान होत आहे. येथील उमेदवारांनी भेटीगाठीवर भर दिला असून, प्रत्येक उमेदवार मतदानासाठी अखेरची धडपड करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खंडाळी येथे थेट दुरंगी लढत होत आहे. ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये ४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

खंडाळी ग्रामपंचायत निवडणुकीत विकास हाच मुद्दा घेऊन प्रमुख दोन पॅनेल आमने-सामने आली आहेत. गत पाच वर्षांमध्ये रखडलेला विकास, रस्त्यांची झालेली दुरवस्था, सांडपाण्याची न लागलेली विल्हेवाट, तुंबलेली गटारे, पावसाळ्यात रस्त्यांना तलावाचे आलेले स्वरुप यासह इतर समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्याअभावी होणारी शेतकऱ्यांची हेळसांड पाहून आमदार बाबासाहेब पाटील यांनी पशुवैद्यकीय दवाखाना आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालवले आहेत. उजना दूध डेअरीच्या माध्यमातून दुधाळ जनावरांचे वाटप केल्याने खंडाळी येथील शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय नावारुपाला येत आहे. आमदार पाटील यांनी ग्रामपंचायत आमच्या ताब्यात द्या, आम्ही विकास करून दाखवू, अशी मतदारांना साद घातली आहे. दोन माजी सरपंचांमध्ये प्रमुख लढत हाेत आहे. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ३ हजार ३३१ मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार आहे. यात १ हजार ५५९ महिला तर १ हजार ७७२ पुरुष मतदारांचा समावेश आहे.

Web Title: Churashi battle in Khandali, 26 candidates in the fray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.