आ. अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:14 AM2021-07-02T04:14:42+5:302021-07-02T04:14:42+5:30
हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून मनरेगाअंतर्गत याकतपूर येथे ३० एकरांवर केशर आंबा ...
हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून मनरेगाअंतर्गत याकतपूर येथे ३० एकरांवर केशर आंबा फळबाग लागवडीचा प्रारंभ आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच सदाशिव जोगदंड, विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संतोष मुक्ता, संजय कुलकर्णी, अशोक औटी, दीपक सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी संजीवकुमार ढाकणे, अरुण गुट्टे, मंडळ कृषी अधिकारी सुरवसे, गणेश राऊत आदी उपस्थित होते.
आ. अभिमन्यू पवार यांच्या औसा तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष सुरेश कारंजे व भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. अभिमन्यू पवार, सुशीलदादा बाजपाई, ॲड. अरविंद कुलकर्णी, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे, भाजपचे गटनेते सुनील उटगे, संतोष मुक्ता, माजी नगराध्यक्ष किरण उटगे, दिलीप देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, संजय कुलकर्णी, युवराज बिराजदार, शिव मुरगे, संजय माळी, उन्मेश वागदरे आदी उपस्थित होते.
लातूर शहरात आ. अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात सकाळी अभिषेक करण्यात आला, तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. शहरात रक्तदान शिबिर, शासकीय रुग्णालयात अन्नदान करण्यात आले. औसा शहरात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित शिबिरात ३२ जणांनी रक्तदान केले. शहरात ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. नांदुर्गा येथे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पशुचिकित्सा व रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते फिरत्या पशुचिकित्सालय मोबाईल व्हॅनचे लोकार्पण झाले. औसा मतदारसंघातील मदनसुरी, कासार बालकुंदा, उजनी व हासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर देण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर.शेख, डॉ. देवणीकर उपस्थित होते. (वा.प्र.)