संगनमत करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:34 AM2020-12-16T04:34:47+5:302020-12-16T04:34:47+5:30
सौर ऊर्जा पॅनलच्या सर्व्हिस वायरची चोरी लातूर : चाकूर तालुक्यातील बोथी येथील शेतातील सौर ऊर्जा पॅनलची प्लेट तोडून नुकसान ...
सौर ऊर्जा पॅनलच्या सर्व्हिस वायरची चोरी
लातूर : चाकूर तालुक्यातील बोथी येथील शेतातील सौर ऊर्जा पॅनलची प्लेट तोडून नुकसान करण्यात आले. तसेच कंट्रोलर बाॅक्स व सर्व्हिस वायर चोरून नेल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी बळीराम त्र्यंबकराव भोसले (४०, रा. बोथी, ता. चाकूर) यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये फिर्यादी भोसले यांचे जवळपास ९० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोना. साळवे करीत आहेत.
कारची पादचाऱ्यास धडक; एक जखमी
लातूर : पाण्याच्या टाकीजवळ रोड क्राॅस करीत असताना जुनी रेल्वे लाईन रस्त्यावर आले असता दयानंद गेटकडून भरधाव वेगात येणाऱ्या कारने एकास धडक दिल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी फिर्यादी शिवपुत्र दादाराव बिराजदार (७०, रा. प्रकाश नगर, लातूर) यांच्या तक्रारीवरून कार क्र. एमएच २४ सी ५०५६ च्या चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या अपघातात फिर्यादी जखमी झाले आहेत. पुढील तपास पोना. घुले करीत आहेत.
माध्यमिक शाळांमध्ये उपाययोजनांचे पालन
लातूर : शासनाच्या निर्देशानुसार नववी, दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसादही मिळत आहे. कोरोनाच्या संकटामुळे मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी उपाययोजनांचे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांत काटेकोरपणे पालन केले जात आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे तापमान व पल्स ऑक्सिमीटरने तपासणी केली जात आहे. शाळांची तपासणी करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने पथके नियुक्त करण्यात आली असून, विविध शाळांना भेटी दिल्या जात आहेत.
पथदिवे बंद
लातूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पथदिवे सुरू करण्यासाठी शहर महापालिकेने मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.