शिवसेनेतर्फे कोरोना जागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:20 AM2021-04-27T04:20:21+5:302021-04-27T04:20:21+5:30

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने, सहायक पोलीस निरीक्षक क्रांती निर्मळ, पोलीस नाईक संतोष ठाकरे, संतोष गायकवाड, अभिजित थोरात, बालाजी ...

Corona awareness campaign on behalf of Shiv Sena | शिवसेनेतर्फे कोरोना जागृती अभियान

शिवसेनेतर्फे कोरोना जागृती अभियान

Next

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने, सहायक पोलीस निरीक्षक क्रांती निर्मळ, पोलीस नाईक संतोष ठाकरे, संतोष गायकवाड, अभिजित थोरात, बालाजी डपडवाड, अनंत बुधोडकर, नरसिंग जाधव आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दाने म्हणाले, कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहे. लसीकरण मोहीम वेगात राबविली जात आहे. जनजागृतीसाठी एक रथ तयार करण्यात आला आहे.

तहसीलदार राहुल पाटील म्हणाले, ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

पोलीस प्रशासनाच्या सहकार्यातून प्रत्येक गावात लॉकडाऊनचे नियम पाळण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत. जे बाधित गृहविलगीकरणात आहेत, त्यांच्या हातावर प्रशासनाने होम क्वारंटाईनचा शिक्का मारावा. कोरोनाच्या भीतीने काहीजण शेतात राहत आहेत. त्यांच्यासाठी सिंगल फेज विजेची सोय करावी, असेही सचिन दाने म्हणाले. हा उपक्रम जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, लातूर ग्रामीण तालुकाप्रमुख ॲड. प्रवीण मगर, तालुकाप्रमुख हरिभाऊ साबदे यांचा मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावेळी ॲड. प्रवीण मगर, कोंडिराम काळे, कपिल चितपल्ले, बालाजी कसपटे, मुन्ना आकनगिरे आदी उपस्थित होते.

Web Title: Corona awareness campaign on behalf of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.