आषाढीनिमित्त समर्थ धोंडूतात्या मंदिराचे दुरुन घेतले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:14 AM2021-07-21T04:14:59+5:302021-07-21T04:14:59+5:30
आषाढी एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र डोंगरशेळकी येथील श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची महापूजा पहाटे ५ वा. तहसीलदार रामेश्वर गोरे व त्यांच्या सुविद्य ...
आषाढी एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र डोंगरशेळकी येथील श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची महापूजा पहाटे ५ वा. तहसीलदार रामेश्वर गोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी संपदा गोरे यांच्या हस्ते झाली. यावेळी अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, वाढवणा ठाण्याचे सपोनि. बाळासाहेब नरवटे, उदगीर पंचायत समितीचे उपसभापती बालाजी मरलापल्ले, सरपंच नागरबाई कांबळे, तलाठी दत्तात्रय मोरे आदी उपस्थित होते.
महापुजेनंतर मंदिर समितीच्यावतीने विश्वस्त व्यंकटराव मुंढे, बाबूराव घटकार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. याप्रसंगी माजी सरपंच व्यंकटराव मरलापल्ले, गणेश मुंढे आदी उपस्थित होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. यावेळी सपाेनि बाळासाहेब नरवटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पायी आलेल्या भाविकांनी घेतले कळसाचे दर्शन...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असले तरी श्री समर्थ धोंडूतात्यांच्या दर्शनासाठी भाविक पायी चालत आले होते. मंदिर बंद असल्यामुळे कळसाचे दर्शन घेत भाविकांनी समाधान व्यक्त करून गावाकडे परतत होते. भाविक धोंडूतात्या महाराज की जय, असा जयघोष करीत होते.