या निर्णयामुळे राज्यातील बालकांची काळजी व संरक्षण केले जाणार आहे. जिल्हास्तरावर टास्क फोर्स स्थापन करून दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे पालणपोषण, संरक्षण, शिक्षण, आदी संपूर्ण जबाबदारी शासनाच्या वतीने पार पाडली जाणार आहे. त्यामुळे या उपाययोजना आधार देणाऱ्या आहेत. या निर्णयाबद्दल महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे कौतुक करण्यात आले आहे.
निवेदनावर जनआंदोलनाचे ॲड. प्रदीपसिंह गंगणे, बालाजी पिंपळे, प्रा. दत्तात्रय खरटमोल, ताहेर सौदागर, प्रा. ओमप्रकाश झुरळे, जमालोद्दीन मणियार, आनंद पारसेवार, ॲड. सुहास बेद्रे, ॲड. अभिजित मगर, किरण कांबळे, ॲड. सुषमा गंगणे-बेद्रे, ॲड. छाया मलवाडे-कुचमे, श्रीकांत गंगणे, ॲड. शीतल जाधव, प्रवीण नाबदे, संतोष मस्के, डाॅ. अंबादास कारेपूरकर, भीमराव दुनगावे, साईनाथ घोणे, दिगंबर कांबळे, आदींची नावे आहेत.