जळकाेट तालुक्यातील मंगरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला बांधकामासाठी साडेसहा कोटी रुपयांची तरतूद डीपीडीसीकडून करण्यात आली आहे. मंगरुळ पाटीपासून तेरा गावे जवळच आहेत. या गावांसाठी मंगरुळ ते बाेरगाव येथील मध्यभागाची जागा गैरसाेयीची आहे. वाढवणा बु. ते जळकाेट जाणाऱ्या प्रमुख मार्गालगत हे आराेग्य केंद्राची उभारणी केल्यास साेयीचे हाेणार आहे. याबाबत पालकमंत्री अमित देशमुख, राज्याचे बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनाही निवेदन दिले आहे. निवेदनावर जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, चेअरमन धनराज पाटील, चेअरमन गंगाधर मुसळे, चेअरमन हनुमंतराव नागलगाव, रामेश्वर जाधव पाटील, सरपंच मनोहर वाकळे, सरपंच संतोष कोसंबे, नगरसेवक रमाकांत रायवार, रमेश चोले, मल्हारी भांगे, साहेबराव पाटील, रसूल शेख, ज्ञानेश्वर मुसळे, किशनराव चव्हाण, माधव कोठाळे, बळीराम सोनटक्के, बाळू शेट्टी, सूर्यकांत पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदरचे निवेदन तहसीलदार नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांना देण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरुळ पाटी येथे उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:15 AM