शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:16 AM2021-01-14T04:16:53+5:302021-01-14T04:16:53+5:30
बाभळगाव येथील शेतावर ऊसरोप लागवड यंत्र प्रात्यक्षिक कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. ऊसरोप यंत्राद्वारे लागवड केल्यास ...
बाभळगाव येथील शेतावर ऊसरोप लागवड यंत्र प्रात्यक्षिक कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. ऊसरोप यंत्राद्वारे लागवड केल्यास शेतकऱ्यांना किफायतशीर दरात ऊस लागवड करता येते. वेळेत, खर्चात बचत होते. एकरी उत्पादकता वाढण्यास मदत होते. शंभर टक्के रोप उगवण क्षमता ठेवण्यासाठी, नियोजित अंतरावर रोपाची लागवड व सरीतील योग्य अंतर ठेवून कमी वेळेत जास्त क्षेत्रावर लागवड करून एकरी उत्पादकता वाढीसाठी यंत्राद्वारे ऊस रोप लागवड करावी या माध्यमातून शेतकरी आणि बेरोजगार युवकांना रोजगार निर्मिती आणि व्यवसायिक संधी निर्माण होणार आहेत. येणाऱ्या काळाची पावले ओळखून शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे ऊसरोप लागवड करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. यावेळी स्वप्निल माईनकर, आदित्य बंडेवार, व्हा. चेअरमन रवींद्र काळे, संचालक जे. एस. मोहिते, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, नारायण पाटील, अमर मोरे, अनिल पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, कुसुमताई कदम, सुभाष माने, दगडूसाहेब पडीले, भैरवनाथ सवासे, रामचंद्र सुडे, आदींसह कारखाना सभासद, शेतकरी उपस्थित होते. राहुल इंगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर रवींद्र काळे यांनी आभार मानले.