कृषि महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:05+5:302021-09-02T04:43:05+5:30
या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.ए.पी.सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी गळीत धान्य संशोधन केंद्राचे प्रमुख ...
या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.ए.पी.सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी गळीत धान्य संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.महारूद्र घोडके, कृषितंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.बी.वाडीकर, प्राध्यापक, कर्मचार उपस्थितीत होते.
शिबीरामध्ये स्पार्क्स लाईफ केअर, मुंबई येथील तज्ञ डॉ.सुनिल बर्गे, डॉ.सिंग, डॉ.प्रसाद व त्यांच्या चमूने उच्च रक्तदाब, मधुमेह व इतर अनुषंगीक शारीरिक व्याधिंच्या शास्त्रोक्त तपासण्या केल्या. या शिबिरात कृषि महाविद्यालयातील व परिसरातील इतर केंद्रातील प्राध्यापक, कर्मचारी, अधिकारी आणि पदव्युत्तर विद्यार्थी-विद्यार्थींनींसह ९८ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर त्यांचा आरोग्य अहवाल संबंधितांना देवून आरोग्यवर्धक दैनंदिन आदर्श जीवनशैली बाबत तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.डी.डी.सुरडकर यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.