शिक्षकांनो लसीकरण करुन घ्या; पाच सप्टेंबरची डेडलाईन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:02+5:302021-09-02T04:43:02+5:30
जिल्ह्यात जि.प.च्या १२६९ शाळा असून, यातील ८५६ शिक्षकांनी पहिला तर ४४६३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच १२५८ खाजगी ...
जिल्ह्यात जि.प.च्या १२६९ शाळा असून, यातील ८५६ शिक्षकांनी पहिला तर ४४६३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच १२५८ खाजगी शाळांतील २१२२ शिक्षकांनी पहिला तर ७३२६ शिक्षकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी शाळातील ३९७ शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी पहिला तर ११०३ जणांनी दुसरा डोस घेतलेला आहे. तर ३ हजार ४७५ शिक्षक आणि ८५० शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अद्यापही लसीचा एकही डोस घेतलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत जि.पच्या शिक्षक कर्मचा-यांचे ९२.७५ तर खाजगी शाळांमधील शिक्षक, कर्मचा-यांचे ७३ टक्के लसीकरण झाले आहे. ज्यांचे लसीकरण झालेल्या नाही त्यांचासाठी शिक्षण विभागाच्या वतीने आरोग्य विभागामार्फत लसीकरण करुन घेण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. सर्वांचेच लसीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सर्वच माध्यमांच्या शाळांनी लसीकरण करुन घ्यावे...
राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्वच माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. शासकीय शाळांचे ९२ टक्के तर खाजगी शाळांचे ७३ टक्के लसीकरण झालेले आहे. उर्वरित दिवसांमध्ये सर्वच शाळांतील कर्मचा-यांनी लसीकरण करुन घ्यावे. - भगवान फुलारी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
शिक्षकांचा मिळतोय चांगला प्रतिसाद...
शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणासाठी शिक्षकांचा पुढाकार आहे. शिक्षकांसाठी विशेष कॅम्पही घेतले जात आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. - प्रकाश देशमुख, मुख्याध्यापक संघ
कोरोनाच्या लढ्यात प्रत्येकाने लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. शाळेतील शिक्षकांचे लसीकरण पुर्ण करण्यावर भर आहे. शासनाच्या निर्देशानुसार सर्वांनाच लस घेण्याच्या सुचना केल्या आहेत. बहूतांश शिक्षक,
कर्मचा-यांनी लस घेतली आहे. - श्रीनिवास जाधव, प्राचार्य