आमदार-खासदारांचा सोशल मीडियावरच गोपाळकाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:11+5:302021-09-02T04:43:11+5:30
खासदार ट्वीटर, फेसबुकवर ॲक्टिव्ह... खासदार सुधाकर शृंगारे हे ट्वीटरसह फेसबुकवरही ॲक्टिव्ह आहेत. श्रावण सोमवार, श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच इतर सणवारांच्या ...
खासदार ट्वीटर, फेसबुकवर ॲक्टिव्ह...
खासदार सुधाकर शृंगारे हे ट्वीटरसह फेसबुकवरही ॲक्टिव्ह आहेत. श्रावण सोमवार, श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच इतर सणवारांच्या शुभेच्छाही ते सध्या सोशल मीडियाच्याच माध्यमातून देत आहेत.
पालकमंत्री अमित देशमुख
पालकमंत्री अमित देशमुख हे सोशल मीडियाच्या जवळपास सर्वच प्लॅटफॉर्मसवर आहेत. फेसबुकवर त्यांच्या दररोज पोस्ट असतात. शिवाय, सर्व सण-उत्सवांच्या शुभेच्छा नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहेत.
संभाजी पाटील निलंगेकर
निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हेही सुरुवातीपासून सोशल मीडियावर अधिक सक्रिय आहेत. अगदी कार्यकर्त्यांच्या वाढदिवसापासून ते महापुरुषांच्या जयंती, स्मृती ते शेअर करीत असतात. याचपद्धतीने सध्या निर्बंधांमुळे सणावाराच्या शुभेच्छाही ते आपल्या अकाऊंटवरून नियमित शेअर करतात.
धीरज देशमुख
लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे ट्वीटरपेक्षाही फेसबुकचा जास्त वापर करताना दिसतात. या माध्यमातून ते सध्या नागरिकांना सण-उत्सवांच्या शुभेच्छा नियमित देताना दिसत आहेत. सोबतच इतर घडामोडीही ते यावर शेअर करतात.
राज्यमंत्री संजय बनसोडे
उदगीरचे आमदार राज्यमंत्री संजय बनसोडे हे नजीकच्या काळात सोशल मीडियात अधिक सक्रिय झाले आहेत. स्नेही, आप्तेष्टांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच ते सणावाराच्या शुभेच्छाही फेसबुकवरून देत आहेत. ट्वीटरचा वापर ते फेसबुकच्या तुलनेत क्वचितच करतात.
बाबासाहेब पाटील
अहमदपूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील फेसबुकवर सक्रिय आहेत. विविध सण, उत्सव, शासनाचे निर्णय, भेटी आदींबाबत पोस्टद्वारे जनतेला ते माहिती देतात. मतदारसंघातील विकासकामांची माहितीही ते समाजमाध्यमांद्वारे देतात.
अभिमन्यू पवार
औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार फेसबुक आणि ट्वीटरवर ॲक्टिव्ह आहेत. शेतकऱ्यांचे विविध प्रश्नांसाेबतच मतदारसंघातील विकासकामे, सण, उत्सवांचे शुभेच्छा संदेश ते देत असतात. फेसबुकवर ते अधिक सक्रिय असून, विविध कामांची माहिती ते दररोज शेअर करतात.