लातूर : कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणाही कमी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतर्फे रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णवाहिका देण्यात आली. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मजगे नगर भागातील कैलास निवासस्थानासमोर भाजप नेते तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील-कव्हेकर यांच्या हस्ते करण्यात आला असून, सदरील रुग्णवाहिका महापालिका आयुक्त अमन मित्तल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, महापालिका गटनेते शैलेश गोजमगुंडे, भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील-कव्हेकर, बाबासाहेब कोरे, सुभाषअप्पा सुलगुडले, सूर्यकांत शेळके, जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक नीळकंठराव पवार, नगरसेवक बालाजी शेळके, एम.एन.एस.बँकेचे उपकार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते, मॅनेजर शिवाजी सूर्यवंशी, मॅनेजर गणेश पवार, पंकज जाधव, भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अमोल गित्ते, सागर घोडके, काका चौगुले, गजेंद्र बोकन, अमित पोतदार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या हस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:19 AM