अभिनव बाला उपक्रम पथदर्शी ठरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:16 AM2020-12-26T04:16:26+5:302020-12-26T04:16:26+5:30
अंकुलगा (राणी) येथे गुरुवारी आयोजित तालुकास्तरीय अभिनव बाला कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने होते. यावेळी ...
अंकुलगा (राणी) येथे गुरुवारी आयोजित तालुकास्तरीय अभिनव बाला कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, शिक्षणाधिकारी भगवानराव फुलारी, उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत, गटशिक्षणाधिकारी अनिल पागे यांची उपस्थिती होती. यावेळी बाला उपक्रमात सहभागी शिक्षक, पालक, ग्रामस्थ, स्वयंसेवी शिक्षणप्रेमी मंगल गुराळे, तंबाखूमुक्त शाळा समन्वयक सुशील पांचाळ यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अनिल पागे, सूत्रसंचालन डोंगरे आणि सातपुते यांनी केले. आभार गोवर्धन चपडे, शिवाजी एरंडे यांनी मानले. यावेळी विठ्ठल वाघमारे, सतीश नाईकवाडे, सोनाली शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले.
२८ निकषांची पाहणी...
अभिनव बाला उपक्रम यशस्वी होण्यासाठी देण्यात आलेले कंपाऊंड वाॅल, डाॅटबोर्ड, ग्रापबोर्ड, टायर, फरशी, रॅम्प आदी २८ निकषांची पाहणी करण्यात आली. निकषांची पूर्तता केल्याचे दिसून आल्यामुळे तालुक्यातील शंभर टक्के शाळांत बाला उपक्रम राबविला तर तालुका जिल्ह्यातील इतर शाळांना पथदर्शी ठरेल, असे सीईओ अभिनव गोयल म्हणाले. यावेळी गोयल यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामसेवकांशी थेट संवाद साधला.