महिनाभरात वाहतूक व्यवस्था सुरळीत करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:16 AM2020-12-25T04:16:34+5:302020-12-25T04:16:34+5:30

येथील शहर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, शहर पोलीस ...

Let's smooth the transportation system within a month | महिनाभरात वाहतूक व्यवस्था सुरळीत करु

महिनाभरात वाहतूक व्यवस्था सुरळीत करु

Next

येथील शहर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, शहर पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड, गजानन पाटील, शाहदेव खेडकर, ऐडके, शेख मुजाहिद, एस.एस. दुबळगुंडे, राजकुमार घोरपडे आदी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले, शहरातील वाहतुकीची समस्या कायमची सोडविण्यासाठी सर्वप्रथम शहरात पायाभूत सुविधांची गरज आहे. त्यासंदर्भात मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी पालिकेचे मुख्याधिकारी, महावितरणचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन वाहतूक व्यवस्थेत कशी सुधारणा करता येईल, त्या- त्या विभागांच्या अडचणी काय आहेत, याची माहिती घेतली. पालिकेने वाहतूक व्यवस्था व अतिक्रमण काढण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला देऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याची हमी देऊन शहरात एकेरी वाहतूक करण्यासाठी अहवाल दिला आहे.

शहरात प्रवासी वाहतूक करणारी खासगी जीप, टमटम, ट्रॅव्हल्सचे थांबे, शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲटोरिक्षांची तपासणी, हैदराबाद ते नांदेड, लातूर ते देगलूर मुख्य रस्त्याच्या बाजूला थांबणारे हातगाडे, अवजड वाहनांची याच मार्गाने होणारी वाहतूक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंचायत समिती, तहसील, उपजिल्हाधिकारी कार्यालय, बसस्थानक परिसर, दूध डेअरी परिसर,

जयजवान चौक, पत्तेवार चौक, उमा चौक, शाहू चौक, कॅप्टन चौक आदी भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे.

नागरिकांनीही नियमांचे पालन करावे...

नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, महसूल, महावितरण यांचे सहकार्य घेऊन सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १ फेब्रुवारीपासून वाहतूक समस्येतून मुक्तता करण्याबाबतचा आदेश काढण्याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचणे शक्य नाही. तेव्हा वाहतुकीचे नियम जनतेनेही पाळावेत, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्ष रहावे, असेही ते म्हणाले.

Web Title: Let's smooth the transportation system within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.