‘मोदीजी...मेरे पास ९ गाय और १३ भैंसें हैं’, लातूरच्या शेतकऱ्याचा संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 02:19 AM2020-12-26T02:19:53+5:302020-12-26T06:47:02+5:30

PM Narendra Modi interacts with farmers : लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइनद्वारे थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी मातोळ्याचे शेतकरी गणेश भोसले यांचा हा संवाद झाला.

‘Modiji ... I have 9 cows and 13 buffaloes’, a dialogue of a farmer from Latur | ‘मोदीजी...मेरे पास ९ गाय और १३ भैंसें हैं’, लातूरच्या शेतकऱ्याचा संवाद

‘मोदीजी...मेरे पास ९ गाय और १३ भैंसें हैं’, लातूरच्या शेतकऱ्याचा संवाद

googlenewsNext

लातूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे अनुदान वाटप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक शेतकऱ्यांशी शुक्रवारी संवाद साधला. त्यात लातूर जिल्ह्यातील मातोळा (ता. औसा) येथील शेतकरी गणेश राजेंद्र भोसले यांचाही समावेश होता. त्यांना पंतप्रधानांनी शेतीशिवाय आणखी काय करता, असा सवाल केला. त्या वेळी शेतकऱ्याने सांगितले की, मेरे पास ९ गाय और १३ भैंसें हैं. असे उत्तर देताच पंतप्रधानांनी अधिक मनमोकळा संवाद केला. 
लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइनद्वारे थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी मातोळ्याचे शेतकरी गणेश भोसले यांचा हा संवाद झाला. तुमच्याजवळ किती जमीन आहे? 
पूर्वी काय करीत होतात? शेतीशिवाय आणखी काही करता का? असे पंतप्रधानांनी विचारले. त्यावर भोसले म्हणाले, जमीन ३ हेक्टर आहे. त्यावर सोयाबीन आणि तूर पीक घेतले आहे. पूर्वीपासून शेतीच करतो. तसेच शेतीबरोबर माझ्याकडे ९ गायी आणि १३ म्हशी आहेत. 
ज्याद्वारे मिळालेले पैसे शेतीत लावतो. त्यावर पंतप्रधानांनी विचारले की, कमाई शेतीमध्ये होते की पशुपालनात? त्यावर  भोसले यांनी पशुपालन शेतीला पूरक असल्याचे सांगितले. पंतप्रधान पीक विम्याचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले. अडीच हजार विमा भरला होता. त्याचे ५४ हजार ३१५ रुपये मिळाल्याबद्दलही भोसले यांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधानांनीही केले राम राम 
पंतप्रधानांनी ‘नमस्ते गणेशजी’, असे म्हणत संवादाला सुरुवात केली. त्या वेळी गणेश यांनी नमस्तेचे उत्तर ‘राम राम’ करून दिले. तेव्हा मोदीही ‘राम राम’ म्हणाले.

Web Title: ‘Modiji ... I have 9 cows and 13 buffaloes’, a dialogue of a farmer from Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.