जळकोट बाजार समितीच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, माजी संचालक बाबुराव जाधव, माजी सभापती धोंडिराम पाटील, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, संगायोचे अध्यक्ष संग्राम पाटील, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अशोकअण्णा डांगे आदी उपस्थित होते.
जळकोट बाजार समितीवर अशासकीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या ६ तर काँग्रेसचे ३ संचालकांची निवड झाली. मुख्य प्रशासक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, प्रशासक तथा संचालक म्हणून काँग्रेसचे मन्मथप्पा किडे, दत्ता पवार, महेताब फतरुसाब बेग, राष्ट्रवादीचे चंद्रशेखर पाटील, दिलीप कांबळे, श्रीकृष्ण पाटील, गजानन दळवे, उमाकांत सोनकांबळे यांची नियुक्ती झाली आहे.
यावेळी आगलावे म्हणाले, पालकमंत्री अमित देशमुख आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने शेतकरी, व्यापारी व हमाल-मापाडींच्या हिताचे प्रश्न मार्गी लावू. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचा प्रयत्न करु. शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव प्रयत्न करणार आहे.
यावेळी एम.जी. मोमीन, बाबुराव जाधव, चंद्रशेखर पाटील, गजेंद्र दळवे, महेताब बेग, मारुती पांडे, मन्मथप्पा किडे यांची भाषणे झाली.
नवनिर्वाचित मुख्य प्रशासक व संचालकांचा ए.एन. वाघमारे यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, बाबुराव जाधव, दीपक आंब्रे, धनंजय भ्रमण्णा आदी उपस्थित होते.