अहमदपूरच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:16 AM2020-12-25T04:16:41+5:302020-12-25T04:16:41+5:30
... महावितरणची एक गाव- एक दिवस मोहीम औसा : वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरण आपल्या दारी अभियानाअंतर्गत गूळखेडा येथे ...
...
महावितरणची एक गाव- एक दिवस मोहीम
औसा : वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरण आपल्या दारी अभियानाअंतर्गत गूळखेडा येथे एक गाव एक दिवस मोहीम राबविण्यात आली. यावेळी सहाय्यक अभियंता अमित शृंगारे, प्रधान तंत्रज्ञ संजय शिंदे, वरिष्ठ सहाय्यक केशव जाधव, नरसिंग पांचाळ, सिद्धेश्वर सर्जे, सुभाष येरटे, मंजीद पटेल, दगडू गिराम, भास्कर यादव, ध्वज भोसले, उत्तम भोसले, विष्णू महालिंगे, गिराम रोंगे, योगिराज भोसले, भास्कर पाटील, दिनकर बेले, अरविंद भोसले, सुधीर भोसले आदी उपस्थित होते.
...
नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात कार्यक्रम
किनगाव : येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात गणित दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य प्रकाश कळसाईतकर यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. अनिल सुरवसे, प्रमोद शिरुरकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
...
तोंडार ग्रामपंचायतीतर्फे भांजी हिचा सत्कार
उदगीर : तालुक्यातील तोंडार येथील मयुरी भांजी हिने नीट परीक्षेत यश संपादन केल्याने तिचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शैलजा पटवारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी मुंडे, ग्रामपंचायत सदस्य भरत कोचेवाड, विठ्ठल सुरनर, सदस्या शारदा पाटील, अर्चना पाटील, दत्ता बिरादार, प्रभू पाडे, वसंत भांजी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सतीश पाटील यांनी केले.
...
भाजीपाला, फळ मार्केटसाठी जागेची मागणी
उदगीर : शहरातील भाजीपाला मार्केट परिसरात भाजीपाला, कांदा, फळांचे ठोक व्यवहार हाेतात. या ठिकाणी जागा अपुरी असल्याने व्यापाऱ्यांना बीट लिलाव करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे भाजीपाला, फळांच्या ठोक मार्केटसाठी प्रशासनाने तत्काळ जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र हातगाडा व्यापारी अल्पसंख्याक युनियनच्या वतीने उप जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष महेबूब बागवान, जावेद बागवान, मुसा बागवान, बबलू बागवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.