रबी हंगाम पीक स्पर्धेत विभागात ६, तर जिल्ह्यात ९ शेतकरी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:13 AM2021-07-03T04:13:54+5:302021-07-03T04:13:54+5:30

रबी ज्वारी पिकामध्ये सुनीता जयवंतराव पाटील (७२.५०) व नीळकंठ लिंबाजी झुंजे (६९.१०) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. ...

In Rabi season crop competition 6 farmers won in the division and 9 farmers in the district | रबी हंगाम पीक स्पर्धेत विभागात ६, तर जिल्ह्यात ९ शेतकरी विजयी

रबी हंगाम पीक स्पर्धेत विभागात ६, तर जिल्ह्यात ९ शेतकरी विजयी

Next

रबी ज्वारी पिकामध्ये सुनीता जयवंतराव पाटील (७२.५०) व नीळकंठ लिंबाजी झुंजे (६९.१०) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. रबी गहू पिकांमध्ये विठ्ठल बळवंतराव होनराव (७४.८०), किशोर दत्तात्रय कोळपे (७३.००) व श्रीमंत गावकरे (७०.५९) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. हरभरा पिकामध्ये रवींद्र रंगनाथ कुलकर्णी (४७.८०) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. जिल्ह्यात प्रतिहेक्टरी जास्त उत्पादन घेऊन रबी ज्वारी पिकामध्ये हणमंत भुजंगराव चव्हाण (६७.५८), बाळासाहेब रावसाहेब देशमुख (६६.१६) व शिवदास बाबूराव झुंजे (६६.०३) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. रबी गव्हामध्ये बालाजी बाबूराव येडले (६२.३६), अनिल बळीराम सरवदे (६१.८४) व मनोज रामराव पवार (६६.००) यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला, तर रबी, हरभरा पिकामध्ये नागनाथ निवृत्तीराव सूर्यवंशी (४७.५०), सुशांत बन्सी चव्हाण (४७.२३) व सूर्यकांत दत्तात्रय केंद्रे यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

Web Title: In Rabi season crop competition 6 farmers won in the division and 9 farmers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.