हातभट्टी अड्ड्यांवर छापा, पाच जणांविराेधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:19 AM2021-04-22T04:19:53+5:302021-04-22T04:19:53+5:30
पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील काटगाव तांडा परिसरात माेठ्या प्रमाणावर हातभट्टी दारुची निर्मिती आणि विक्री केली जात असल्याची माहिती जिल्हा ...
पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील काटगाव तांडा परिसरात माेठ्या प्रमाणावर हातभट्टी दारुची निर्मिती आणि विक्री केली जात असल्याची माहिती जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाेखेच्या पथकाने काटगाव येथील हातभट्टी अड्ड्यांवर छापा मारला. यावेळी ४६ हजार लिटर रसायन आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हातभट्टी निर्मिती करण्यासाठी लागणारे रसायन आणि इतर साहित्य पाेलीस पथकाने नष्ट केले. याप्रकरणी किशन बाबू चव्हाण, अशाेक पांडुरंग चव्हाण, विश्वनाथ नामदेव चव्हाण, सुखदेव हरिसिंग राठाेड आणि राजाभाऊ चंदर राठोड सर्व रा. काटगाव तांडा ता. लातूर यांच्याविराेधात गाातेगाव पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कोमवाड, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, राजेभाऊ म्हस्के, राम गवारे, हरुण लोहार, युसुफ शेख, सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, राहुल सोनकांबळे, प्रमोद तरडे, भिष्मानंद साखरे, नितीन कटारे, नागनाथ जांभळे, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली.