‘ईद-उल-फित्र’ची नमाज घरोघरी पठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:18 AM2021-05-15T04:18:36+5:302021-05-15T04:18:36+5:30
ऐ अल्लाह, बीमारोंको शिफा फरमा... जगभरात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. आपल्या देशातील कोरोनाची स्थिती गंभीर बनली आहे. अनेकजण या ...
ऐ अल्लाह, बीमारोंको शिफा फरमा...
जगभरात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. आपल्या देशातील कोरोनाची स्थिती गंभीर बनली आहे. अनेकजण या आजाराने त्रस्त आहेत. अनेकांनी आपल्या नात्यातील, कुटुंबातील व्यक्ती गमावल्या आहेत. कोरोनाचा हा आजार लवकर दूर व्हावा. या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण तात्काळ बरे व्हावेत तसेच जगभरातील मानवी कल्याणासाठी घरोघरी प्रार्थना करण्यात आली. ऐ अल्लाह, कोरोनाकी इस बीमारी से तमाम लोगोंको दूर रखना, जो लोग बीमार है, उन्हे जल्दी शिफा देना. जिनके घरमें परेशानी है, उनकी परेशानी दूर करना, अशी प्रार्थना करीत सामाजिक सद्भावना व सलोखा कायम रहावा. एकमेकांची गळाभेट, सुख-दु:खात जाता यावे यासाठी सध्या असलेले कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे म्हणून घरोघरी प्रार्थना झाली.