शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन हे समाजाला उपयुक्त असावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:42 AM2021-09-02T04:42:58+5:302021-09-02T04:42:58+5:30

येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्राम ...

Research in the field of education should be useful to the society | शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन हे समाजाला उपयुक्त असावे

शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन हे समाजाला उपयुक्त असावे

Next

येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी स्वा.रा.ती.म.विद्यापीठ नांदेडचे सिनेट सदस्य डॉ.अशोक मोटे, डॉ.दीपक चाटे, डॉ.प्रकाश शिंदे, स्टाफ सचिव कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले, डॉ.दिनेश मौने, डॉ.संजय गवई, डॉ. यशवंत वळवी, प्रा.गुणवंत बिरादार, बी.पी.सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

डॉ.विठ्ठल मोरे म्हणाले, शैक्षणिक कालखंडामध्ये संशोधन मार्गदर्शक व संशोधक विद्यार्थी यांचे एक सौदार्यपूर्व नाते होते. संशोधक आणि विद्यार्थी यांच्या शैक्षणिक संशोधनामध्ये गुणात्मकता होती. कुठल्याही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासामध्ये शिक्षकाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते तसेच ती समाजाला सुद्धा एक विधायक दिशा देणारी असते असेही ते म्हणाले. प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे म्हणाले, महाविद्यालयाचा शैक्षणिक विकास हे एक टीम वर्क आहे. यामध्ये प्रत्येकाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या जाणीवपूर्वक पार पाडल्या तर त्या महाविद्यालयाचा विकास हा लोकशाही पद्धतीने जलद गतीने घडून येतो. सूत्रसंचालन डॉ.संजय गवई यांनी तर आभार डॉ.यशवंत वळवी यांनी मानले. यशस्वीतेसाठी नरेश वाडकर, कृष्णा कोळी, शुभम बिरादार, बालाजी होनराव यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Research in the field of education should be useful to the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.