प्रशासनाच्या आश्वासनानंतर रासपाचे बेमुदत उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:14 AM2021-07-02T04:14:39+5:302021-07-02T04:14:39+5:30
तुरोरी ते तोगरी रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी. पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे थकीत हप्ते त्वरित मिळावे. येथील स्टेट बँक ...
तुरोरी ते तोगरी रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी. पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे थकीत हप्ते त्वरित मिळावे. येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला कायम शाखाधिकारी मिळावा. नगरपंचायतीला कायम मुख्याधिकारी नियुक्त करावा, अशा मागण्यांसाठी हे उपोषण सुरू होते. या उपोषणाची प्रशासनाने दखल घेत लेखी आश्वासन दिल्याने आनंद जीवने यांनी तूर्तास बेमुदत उपोषण मागे घेतले.
याप्रसंगी तहसीलदार सुरेश घोळवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन मानकरी, अभय साळुंके यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. अजित बेळकोणे, मार्केट कमिटीचे अध्यक्ष माणिकराव लांडगे, अशोक लुल्ले, बाबूराव लांडगे, गजानन भोपणीकर, मल्लिकार्जुन डोंगरे, सोमनाथ कुडते, संजय अंबुलगे, मालबा घोणसे, श्रीमंत लुल्ले, योगेश तगरखेडे यांच्यासह मंडळाधिकारी उद्धव जाधव, अनिता ढगे, तलाठी राजेंद्र कांबळे, सुग्रीव राजे आदी उपस्थित होते.