लातूर तालुक्यातील ६४, रेणापूर- २८, औसा- ४६, निलंगा- ४८, शिरूर अनंतपाळ- २७, देवणी- ३४, उदगीर- ६१, अहमदपूर- ४९, जळकोट- २७ आणि चाकूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी चाकूर तालुक्यातील नळेगाव येथून एकमेव अर्ज दाखल झाला होता. गुरुवारी ६८ नामनिर्देशनपत्रे दाखल झाल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
लातूर तालुक्यातून १३ अर्ज...
लातूर तालुक्यातील सिकंदरपूर येथून २, गुंफावाडीतील ७ इच्छुकांचे ११ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती नायब तहसीलदार राजेश जाधव यांनी दिली.
अहमदपूर तालुक्यातील गुट्टेवाडी येथून ८, तर शेणकूडमधून ४ असे एकूण १२ अर्ज दाखल झाल्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.
औसा तालुक्यातील सिंदाळा जहांगीर येथील एका इच्छुकाने उमेदवारी दाखल केल्याचे तहसीलदार शोभा पुजारी यांनी सांगितले.
उदगीर तालुक्यातील कुमठा (खु.) येथून २, निडेबन- ६, पिंपरी- १, लोणी- ३, हंडरगुळी- ४, हिप्परगा डाऊळ- १ असे एकूण १७ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली.
चाकूर तालुक्यातील नळेगाव- १३, बावलगाव- ७, अजनसोंडा- ४, झरी (खु.)- १ असे एकूण २५ अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी दिली.
पाच तालुक्यांतून एकही अर्ज नाही...
जिल्ह्यातील रेणापूर, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ आणि जळकोट या तालुक्यांतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. शुक्रवारपासून सलग तीन दिवस सुटी असल्याने इच्छुकांना ऑनलाईन उमेदवारी दाखल केल्याची पावती सोमवारपासून सादर करावी लागणार आहे.