तालुक्यातील मदनसुरी येथील शिवाजीराव माने यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याने तालुका शाखेच्या वतीने येथे आयोजित सत्कार सोहळा व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, महिला जिल्हा संघटक डॉ. शाेभाताई बेंजरगे, युवा सेना जिल्हाप्रमुख राहुल मातोंळकर, लिंबन महाराज रेश्मे, तालुकाप्रमुख अविनाश रेश्मे, माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, अशोक सूर्यवंशी, बालाजी माने, प्रल्हाद भोपी, संजय बडुरे, जगदीश लोभे, संजय कुंभार, संजय वाघे, सुदाम नारायणपुरे, श्रीरंग गाडे, कन्हैया पाटील, अमोल ढोरसिंगे, लायक पाशा शेख, प्रशांत वांजरवाडे, रवि नागरसोगे, बलभीम कांबळे, सतीश धायगुडे आदी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन न्याय देण्यासाठी नूतन जिल्हाप्रमुख सक्षम आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांच्या अडचणी त्यांना माहीत आहेत. त्यामुळे ते पदाला योग्य न्याय देतील. यावेळी महिला जिल्हा संघटक डॉ. शोभाताई बेंजरगे, युवासेना जिल्हाप्रमुख राहुल मातोंळकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तालुकाप्रमुख अविनाश रेश्मे, सूत्रसंचालन हरिभाऊ सगरे यांनी केले. आभार प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी मानले. दरम्यान, माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील यांनी हाडगा नाका येथे संपर्क कार्यालय सुरू केले असून त्याचे उद्घाटन जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते झाले. (वा.प्र.)