उदगिरातील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:06+5:302021-07-07T04:25:06+5:30
प्रारंभी स्वातंत्र्य सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन ...
प्रारंभी स्वातंत्र्य सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन तहसीलदार रामेश्वर गोरे, पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या झाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, लाइफ केअरच्या अध्यक्षा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, उद्योजक रमेश अंबरखाने, प्राचार्या सुनीता लोहारे, मंगला विश्वनाथे, लोकमतचे वृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक नितीन खोत, रोटरीचे अध्यक्ष प्रमोद शेटकार, सचिव रवींद्र हसरगुंडे, मारवाडी युवा मंचचे लक्ष्मीकांत सोमाणी, ॲड. गोविंदा सोनी, कारवाँ फाउंडेशनच्या अदिती पाटील, रेल्वे संघर्ष समितीचे मोतीलाल डोईजोडे, विजयकुमार पारसेवार, संतोष फुलारी, हरित वसुंधराच्या अश्विनी निवर्गी, सुनंदा सरदार, उमाकांत पाटील, डॉ. प्रकाश देशपांडे, सुशीलप्रकाश चिमोरे, मीरा चंबुले, स्वाती गुरुडे, दीपक नेत्रगावे आदींची उपस्थिती होती.
पाहुण्यांचे स्वागत तालुका वार्ताहर व्ही. एस. कुलकर्णी, वार्ताहर श्रीपाद सिमंतकर, विनायक चाकुरे, रसूल पठाण, दयानंद बिरादार, बापूराव नराचे, शिवाजी शिंदे, डॉ. धनाजी कुमठेकर, श्रीनिवास सोनी यांनी केले. शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व सॅनिटायझर देण्यात आले.
सूत्रसंचालन श्रीपाद सिमंतकर यांनी केले. आभार व्ही. एस. कुलकर्णी यांनी मानले. रक्त संकलनासाठी ब्लड बँकेचे डॉ. बसवराज शेटकार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
संस्था, महाविद्यालयांचा सहभाग...
रक्तदान शिबिरात रोटरी क्लब, मारवाडी युवा मंच, श्री हावगीस्वामी महाविद्यालय, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आदींनी सहभाग घेतला. याप्रसंगी ब्लड बँकेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच इंडियन रेड क्रॉस व ब्लड बँकेच्या वतीने रोटरी क्लबला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आणि पालिकेच्या सफाई कामगारांना चहापत्ती व साखर वाटप करण्यास आले.
कॅप्शन : स्वातंत्र्य सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत रक्ताचं नातं या मोहिमेंतर्गत उदगीर येथे सोमवारी आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी भारत राठोड, बसवराज पाटील नागराळकर, रमेश अंबरखाने, अदिती पाटील, प्रमोद शेटकार, रवींद्र हसरगुंडे.
२. रक्तदानानंतर डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते वर्षाराणी बंडे यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी धनराज बंडे, रवींद्र हसरगुंडे, डॉ. बसवराज शेटकार.
३. उदगिरातील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.