भारत बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:15 AM2020-12-09T04:15:31+5:302020-12-09T04:15:31+5:30
चाकूर येथील नवीन बस स्थानकासमोरुन, बोथी चौकातून जुने बस्थानकापर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने लागू केलेला शेतकरी विरोधी ...
चाकूर येथील नवीन बस स्थानकासमोरुन, बोथी चौकातून जुने बस्थानकापर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने लागू केलेला शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा. अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांनी मागण्याचे निवेदन तहसीलदारांना दिले. नवीन कृषी कायदा रद्द करावा, शेतमालाला हमीभाव मिळविण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार कार्यवाही करावी आदी मागण्यांचा यात समावेश आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, कॉंग्रेस शहर अध्यक्ष सय्यद मुर्तुजा अली, नगरसेवक गोपाळ माने, इलियास सय्यद, माजी जिल्हाप्रमुख सुभाष काटे, तालुकाप्रमुख गुणवंत पाटील, अंगद पवार, युवक कॉंग्रेस अध्यक्ष निलेश देशमुख, गणेश फुलारी, बालाजी सूर्यवंशी, शिवदर्शन स्वामी, शहर अध्यक्ष राष्ट्रवादी, युवक राष्ट्रवादी अध्यक्ष राहुल सुरवसे, गंगाधर केराळे, सीताराम मोठेराव, भागवत फुले,अनिल शंके, रियाज पठाण, साजीद शेख, गफुर मासुलदार, बिलाल पठाण, बाबूराव शेटे, तिरुमल माने, सुनील शिंदे,समीर शेख, बाळासाहेब भोसले, शरद जाधव, महादेव शिंदे, भागवंत सूर्यवंशी, बालाजी शेळके, शंकर कांबळे, सुधाकर पताळे, प्रकाश पटणे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांनी बंदोबस्त ठेवला. तर चाकूर तालुक्यातील लातूर रोड येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शिवकुमार चांदसुरे, सिध्देश्वर अंकलकोटे, उपसरपंच अब्दुल शेख, राजेश्वर डुमणे, संजय मारापल्ले, विजय मारापल्ले, परशुराम मुंडे, दयानंद वाघमारे, ज्ञानेश्वर पांचाळ आदींनी पुढाकार घेतला.