शहरी भागात जाणाऱ्या एसटी सुसाट; मुक्कामी बसेस कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:00+5:302021-09-02T04:43:00+5:30
ग्रामीण भागात ५० टक्के बसेस सुरू.. रक्षाबंधननिमित्त राज्य परिवहन महामंंडळाच्यावतीने ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या; मात्र आता ...
ग्रामीण भागात ५० टक्के बसेस सुरू..
रक्षाबंधननिमित्त राज्य परिवहन महामंंडळाच्यावतीने ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या; मात्र आता प्रतिसाद कमी झाला आहे, त्यातच पावसाळा सुरू असल्याने रस्त्याच्या समस्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील केवळ ५० टक्केच बसेस सुरू आहेत. प्रतिसाद वाढल्यानंतर बसेस सुरू करण्याचे महामंडळाचे नियोजन आहे.
शहरी भागात जाणाऱ्या बसेस फुल्ल...
लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर, लातूर या पाचही आगारातून शहरासाठी बसेस सोडण्यात येत आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असल्याने या बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. तर ग्रामीण भागात प्रतिसाद नसल्याने काही फेऱ्या बंदच आहेत. लांब पल्ल्यांच्या बसेसमधून चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
मुक्कामी बस येत नसल्याने गैरसोय...
कॉलेजला जायला मुक्कामी बस फायदेशीर ठरायची; मात्र कोरोनाच्या प्रारंभापासून फेऱ्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. परिवहन महामंडळाने मुक्कामी बसेस सुरू केल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल. - तुकाराम गंपले
पूर्वी शहराला जाण्यासाठी एसटी बसचा आधार होता. काही दिवसांपासून मुक्कामी गाडी बंद झाल्याने खासगी वाहनाने शहर गाठावे लागत आहे. ग्रामीण भागातील बसेस तर मुक्कामी गाडी सुरू केल्या. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांची सोय होईल. उद्धव काळदाते
मुक्कामी गाड्या धावतात इतर मार्गावर...
लातूर जिल्ह्यातील पाचही आगारातून जवळपास ११० हून अधिक बसेस मुक्कामी जात; मात्र कोरोनामुळे मुक्कामी बसेस बंद होत्या. आता ५० टक्के बसेस ग्रामीण भागात धावत आहेत.
प्रतिसादानुसार नियोजन...
मध्यंतरी रक्षाबंधननिमित्त बसेसच्या ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या. प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास ग्रामीण भागातील फेऱ्या वाढविण्याचे नियोजन आहे. डिझेलचा खर्च वाढल्याने प्रतिसाद गरजेचा आहे. - सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक