जळकोट येथे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:15 AM2020-12-09T04:15:29+5:302020-12-09T04:15:29+5:30
: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभर विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली ...
: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभर विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली हाेती. मंगळवारी जळकोट येथील महत्मा फुले चौक येथे शेतकऱ्यांनी नांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले. यावेळी दाेन्ही बाजूंची वाहतूक काही काळासाठी ठप्प हाेती. रस्त्यावर दुचाकी, चारचाकी मालवाहतूक करणाऱ्या ट्रक आणि कारच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या बंदला पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याचा रास्ता रोको करून शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला. परिणामी,
या आंदाेलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जळकोटचे तालुकाध्यक्ष मन्मथ आप्पा किडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे, कॅ. राजीव गोविंद पाटील, विलासराव देशमुख युवा मंच लातूरचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती पांडे, नगरसेवक महेश धुळशेटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गोविंदराव भ्रमणा, संचालक बाबूराव जाधव, राजकुमार डांगे, संदीप डांगे, राजीव केंद्रे, पिराजी कोकणे, दस्तगीर घोनसे, धनंजय भ्रमण्णा, प्रदीप राठोड, नितीन धुळशेटे, प्रमेश्वर आनवाढ, देशमुख, संग्राम हसुळे, संग्राम कदम, दत्तात्रय शिंदे, विकास सोमुसे, मन्मथ बोधले, उमाकांत इमडे, बाबूराव जाधव, विठ्ठल चंदावार, सिद्धार्थ सूर्यवंशी, दिलीप कांबळे, पाशा पटेल, पाशा शेख, गोविंद माने, श्रीनिवास मंगनाळे, नामदेव कोकणे, धनंजय भांगे, सुलतान पटेल आदींसह आंदाेलक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
पाेलिसांनी ठेवला चाेख बंदाेबस्त...
विविध संघटनांसह शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या आंदोलनासाठी जळकोट पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी बसस्थानक, महात्मा बसवेश्वर चौक, लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि आंदोलनस्थळी महत्मा फुले चौकात चाेख बंदाेबस्त ठेवला हाेता.