गौरमधील एका शिक्षकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:16 AM2020-12-25T04:16:45+5:302020-12-25T04:16:45+5:30
धर्मराज केशव भोजने (वय ३६, रा. गौर, ता. निलंगा) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, गौर ...
धर्मराज केशव भोजने (वय ३६, रा. गौर, ता. निलंगा) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, गौर येथील धर्मराज भोजने हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात ११ वर्षांपासून सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कमलाकर भोजने यांच्या माहितीवरून निलंगा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. ढोणे, किशोर सूर्यवंशी यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पानचिंचोलीचे पोलीस जमादार सुनील पाटील करीत आहेत. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
मयत धर्मराज भोजने यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.