शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
3
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
4
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
5
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
6
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
7
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
8
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
9
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
10
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
12
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
13
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
14
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
15
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
16
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
17
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
18
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
19
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
20
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?

टेम्पो-दुचाकीचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार

By राजकुमार जोंधळे | Published: March 04, 2023 12:30 AM

या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर टेम्पोमधील ९ मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे. याबाबत जळकोट पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

जळकोट (जि. लातूर) : शिरुर ताजबंद-मुखेड राज्य महामार्गावरील उमरगा पाटी (ता. जळकोट) येथे मोटारसायकल आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर टेम्पोमधील ९ मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे. याबाबत जळकोट पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद-मुखेड महामार्गावर उमरगा (रेतू) पाटीनजीक भरधाव पिकअप टेम्पो (एमएच २६ - एच ९५५४) आणि मोटारसायकलची (एमएच १२ - एडी ६१०८) समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात हमीद चंदूलाल सय्यद (वय ४५, रा. डोंगरगाव बावलगाव, ता. मुखेड, जि. नांदेड) आणि आनंद गोविंदराव कदम (रा. बाबळगाव, ता. अहमदपूर जि. लातूर) हे दोघे जागीच ठार झाले. तर पिकअप टेम्पोमधील ९ मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच जळकोट येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

उमरगा पाटीनजीक सतत होतात अपघात...जळकोट तालुक्यातील उमरगा रेतू पाटीनजीक सतत अपघातांच्या घटना घडत आहेत. शिरुर ताजबंद ते मुखेड महामार्गावर सर्वाधिक अपघात याच उमरगा पाटीनजीकच्या परिसरात झाल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. वाहनांचा अनियंत्रित वेग आणि अपघात प्रवणक्षेत्र असल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत.

अपघातानंतर टेम्पो रस्त्यावरच उलटला...महामार्गावरील उमगरा पाटी येथे झालेल्या भीषण अपघातात भरधाव टेम्पो रस्त्यावरच उलटला. टेम्पोतील ९ मेंढ्यांचा मृत्यू झाला तर अन्य मेंढ्या जखमी झाल्या आहेत. या अपघातात टेम्पो आणि मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर