कारची टेम्पोला धडक, गुन्हा दाखल
लातूर : सारोळा चौक रिंग रोड येथे भरधाव वेगातील एमएच २४ एडब्ल्यू ६५९२ या क्रमांकाच्या कार चालकाने फिर्यादीच्या एमएच २० एजी ३८३८ या क्रमांकाच्या टेम्पोला उजव्या बाजूस जोराची धडक दिली. त्यात ५ हजाराचे नुकसान झाले. याबाबत बालाजी धोंडिराम नागरगोजे (रा. नाथनगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच २४ एडब्ल्यू ६५९२ या क्रमांकाच्या कार चालकाविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भांडणाची कुरापत काढून मारहाण
लातूर : तू मी बोलावले तर का येत नाहीस असे म्हणून भांडणाची कुरापत काढून फिर्यादीस मारहाण झाल्याची घटना तोगरी येथे घडली. याबाबत देवणी पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तू मी बोलावले तर का येत नाही असे म्हणून फिर्यादी दस्तगीर चाँदसाब शेख (रा. तोगरी) यांना डोक्यात, पाठीत तसेच दोन्ही हातापायावर मारून श्याम विठ्ठल तेलंग यांनी जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असे दस्तगीर चाँदसाब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार देवणी पोलीस ठाण्यात श्याम विठ्ठल तेलंग याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कांबळे करीत आहेत.
घरात ठेवलेल्या तीन मोबाईलची चोरी
लातूर : घरातील हॉलच्या खिडकीवर ठेवलेल्या तीन मोबाईलची चोरी झाल्याची घटना लातूर शहरातील प्रकाशनगर येथे घडली. या तिन्ही मोबाईलची किंमत ११ हजार रुपये आहे. याबाबत गुलाब रसुल दस्तगीर पटेल (रा. प्रकाशनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निर्बंधाचे उल्लंघन, दुकानदाराविरुद्ध गुन्हा
लातूर : कोविड-१९ प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत दुकाने बंद ठेवण्याचे निर्बंध असताना वलांडी येथे हरिओम भांडी दुकान उघडे ठेवून आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत अबरार मैनोद्दीन शेख (तलाठी सज्जा वलांडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमाकांत व्यंकटराव इंचुरे यांच्याविरुद्ध कलम १८८ भादंविसह कोविड-१९ उपाययोजना कलम २, ३, ४ साथरोग आदी १८९७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सपोफौ डप्पडवाड करीत आहेत.
धुऱ्यावरील विहिरीच्या कारणावरून मारहाण
लातूर : सामाईक धुऱ्यावरील विहिरीचा भार सामाईक नालीमध्ये पडून नाली बुजत आहे. तो भार काढून घ्या अशी विनंती केली असता फिर्यादीस मी भार काढणार नाही म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कत्तीने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना जानवळ येथे घडली. याबाबत शिवाजी इराप्पा पुसंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंग महादू गावकरे याच्याविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना थोरमोटे करीत आहेत.