शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

मन्याड नदीपात्रात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:15 AM

प्रतिक उर्फ बबलू ज्ञानोबा जायभाये (९), रोहिणी ज्ञानोबा जायभाये (१४), गणेश तुकाराम जायभाये (१२, रा. सुनेगाव शेंद्री, ता. अहमदपूर) ...

प्रतिक उर्फ बबलू ज्ञानोबा जायभाये (९), रोहिणी ज्ञानोबा जायभाये (१४), गणेश तुकाराम जायभाये (१२, रा. सुनेगाव शेंद्री, ता. अहमदपूर) असे मयत तिघा भावंडांची नावे आहेत. सुनेगाव शेंद्री येथील शेतकरी ज्ञानोबा जायभाये व तुकाराम जायभाये हे सख्खे भाऊ आहेत. त्यांचा शेतीवर उदरनिर्वाह असून, त्यांचे शेत मन्याड नदीपात्राच्या काठानजीक आहे. नेहमीप्रमाणे हे दोघे भाऊ आणि प्रतीक उर्फ बबलू, रोहिणी, गणेश ही तीन मुले शनिवारी सकाळी शेताकडे गेली होती. ज्ञानोबा आणि तुकाराम हे दोघे शेतातील काम करीत होते. दुपारच्या वेळी ही तिन्ही मुले शेळ्या चारत मन्याड नदीपात्राजवळ आली. तेव्हा त्यांना लाकडाचे ओंडके दिसले. त्यामुळे त्यांना पाण्यात तरंगण्याचा मोह आवरला नाही.

सदरील लाकडाचे ओंडके पाण्यात ढकलून ही तिन्ही भावंडे त्यावर बसून पाण्याचा आनंद घेत होते. तेव्हा अचानकपणे तोल गेल्याने प्रतीक उर्फ बबलू, रोहिणी, गणेश हे तिघेही पाण्यात पडले. तिघांनाही पोहता येत नसल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, आपली मुले दिसत नसल्याचे पाहून वडिलांनी नदीपात्राकडे येऊन पाहणी करण्यास सुरुवात केली. तेव्हा लाकडाचे ओंडके पाण्यात दिसत होते. त्यामुळे त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. परिसरातील शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. प्रकाश चिलकावार, नागनाथ पवार, नथ्थूलाल परदेशी यांनी पाण्यात उडी मारून शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तिघा भावंडांचे मृतदेह आढळून आले. सदरील मृतदेहांची उत्तरीय तपासणी अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

घटनास्थळास उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, किनगाव ठाण्याचे सपोनि. शैलेश बंकवाड, पोउपनि. गजानन अन्सापुरे, पोहेकॉ. मुरलीधर मुरकुटे, व्यंकट महाके, चंदू गोखरे यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी किनगाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सख्ख्या भावांच्या दोन्ही मुलांवर काळाचा घाला...

ज्ञानोबा जायभाये यांच्या कुटुंबात आई-वडील, स्वत: पती- पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. तर तुकाराम जायभाये यांच्या कुटुंबात स्वत: पती- पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शनिवारीच्या दुर्दैवी घटनेत ज्ञानोबा यांचा एक मुलगा आणि एक मुलगी तर तुकाराम यांचा एक मुलगा मयत झाला. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

प्रतीक होता तिसरीच्या वर्गात...

मयत प्रतिक हा गावातील जिल्हा परिषद शाळेतील तिसरी वर्गात होता. तसेच रोहिणी ही येस्तार येथील साने गुरुजी विद्यालयात आठवीच्या वर्गात होती, तर गणेश हा गंगाहिप्परगा येथील बळीराजा विद्यालयात सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तिन्ही विद्यार्थी हुशार होते, असे शिक्षकांनी सांगितले.

एकाच चितेवर तिघांवर अत्यंसंस्कार...

मयत तिन्ही भावंडांवर शनिवारी रात्री एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता. त्यामुळे उपस्थितांचे हृदय हेलावत होते.

सोबत पासपोर्ट दोन फोटो...

१. ०३एलएचपी प्रतीक जायभाये

२. ०३एलएचपी गणेश जायभाये

३. ०३एलएचपी रोहिणी जायभाये