राजकुमार जोंधळे
लातूर : टिप्परच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना लातुरातील राजीव गांधी चाैकात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी शंकरराव पांडुरंग कोंपले (वय ५९, रा. वासनगाव, ता., जि. लातूर) हे माेटारसायकलवर (एमएच २४-बीएच १८१३) कामासाठी जात हाेते. दरम्यान, राजीव गांधी चाैकात आले असता, त्यांच्या माेटारसायकलला टिप्परने (एमएच २४-एयू ८०९९) पाठीमागून जाेराची धडक दिली.
या अपघातात फिर्यादी हा राेडवर पडल्याने डाव्या हाताला, पोटरीला मार लागून बाेटे फॅक्चर झाले आहे. शिवाय, कमरेला डाव्या बाजूला मार लागला आहे. तर दाेन्ही पायांच्या पंजालाही मार लागला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.