शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
2
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
3
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
4
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
5
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
6
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
7
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
8
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
9
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
10
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
11
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
12
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
13
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
14
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
15
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
16
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
17
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
18
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
19
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
20
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता

परीक्षा शुल्क मिळविण्यासाठी करा जि.प. च्या संकेतस्थळावर क्लिक १० हजार उमेदवार

By हरी मोकाशे | Published: September 18, 2023 9:39 PM

लवकर भरा माहिती

लातूर : राज्य सरकारने मार्च २०१९ व ऑगस्ट २०२१ मध्ये ३४ जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले होते. मात्र, ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांचे परीक्षा शुल्काकडे लक्ष लागून होते. दरम्यान, हे शुल्क परत देण्याचा ग्रामविकास विभागाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासनाच्या https://maharddzp.com संकेतस्थळावर उमेदवारांनी संपूर्ण माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या गट- क मधील १८ संवर्गातील पदांच्या भरतीसाठी मार्च २०१९ मध्ये ग्रामविकास विभागाने जाहिरात प्रसिध्द केली होती. तसेच ऑगस्ट २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. दरम्यान, शासनाने ही भरती प्रक्रिया रद्द केली.

या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या www.zplatur.gov.in संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्यावी आणि काळजीपूर्वक माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी केले आहे.

अचूक माहिती भरावी...

परीक्षा शुल्क परत मिळविण्यासाठी उमेदवारांनी https://maharddzp.com संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक, बँक खाते क्रमांक, पावती, फोन क्रमांकासह पत्ता अशी आवश्यक ती माहिती अचूकपणे भरावी. सदरील संकेतस्थळाची लिंक ही लातूर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर आहे. जिल्ह्यातील १० हजार ९२ उमेदवारांना लाभ मिळणार आहे.- नितीन दाताळ, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन.