लातूरमध्ये २६ पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By राजकुमार जोंधळे | Published: July 8, 2023 02:08 PM2023-07-08T14:08:10+5:302023-07-08T14:08:30+5:30

पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांचे आदेश

Transfer of 26 police officers in Latur | लातूरमध्ये २६ पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

लातूरमध्ये २६ पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

googlenewsNext

लातूर : जिल्हा पाेलिस दलातील सात पाेलिस निरीक्षक, सहा पाेलिस उपनिरीक्षक आणि १३ सहायक पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी जारी केले आहेत.

लातूर जिल्ह्यातील पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पाेलिस नियंत्रण कक्षातील सुधाकर देडे यांची अहमदपूर, विठ्ठल दराडे यांची शिरूर अनंतपाळ, साहेबराव नरवाडे यांची चाकूर, विष्णुकांत गुट्टे यांची देवणी, अशाेक अनंत्रे यांची रेणापूर, सुनील रेजितवाड यांची औसा तर बालाजी माेहिते यांची चाकूर येथून पाेलिस कल्याण विभागात बदली करण्यात आली आहे. सहा पाेलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यामध्ये गांधी चाैकचे व्यंकट कव्हाळे याची भादा पाेलिस ठाण्यात बदली झाली आहे. शिरूर अनंतपाळचे जिलानी मानुल्ला यांची रेणापूर, स्थानिक गुन्हे शाखेचे शैलेश जाधव यांची उदगीर ग्रामीण ठाणे, लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे आयुब शेख यांची दहशतवादविराेधी पथकामध्ये बदली झाली आहे. शिवाजीनगर ठाण्याचे भगवान माेरे यांची लातूर ग्रामीण, लातूर ग्रामीणचे तानाजी पाटील यांची शिवाजीनगर ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

१३ सहायक पाेलिस निरीक्षकांनाही बदलले...
सहायक पाेलिस निरीक्षकांच्या बदल्यामध्ये पाेलिस कल्याण विभागातील बाळासाहेब नरवटे यांची मुरुड, उदगीरचे भीमराव गायकवाड यांची वाढवणा (बु.), वाढवणा ठाण्यातील पठाण यांची गांधी चाैक ठाणे, मरुड येथील ढाेणे यांची जिल्हा विशेष शाखा, गातेगावचे अशाेक घारगे यांची विवेकानंद चाैक, उदगीर ग्रामीण ठाण्याचे राहुल भाेळ यांची औसा, स्थागुशाचे व्यंकटेश्वर आलेवार यांची एमआयडीसी, एमआयडीसीच्या दीपाली गिते यांची लातूर ग्रामीण, अहमदपूर येथील दुरपडे यांची पाेलिस अधीक्षक कार्यालय, रेणापूर येथील क्रांती निर्मळ यांची टीएमसी, सायबर ठाण्याचे सूरज गायकवाड यांची अपर पाेलिस अधीक्षक कार्यालय, टीएमसीचे बालाजी ताेटेवाड यांची अहमदपूर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

Web Title: Transfer of 26 police officers in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.