चाेरट्या मार्गाने पशुधनांची वाहतूक; चार टेम्पाे पकडले; रेणापूर पाेलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Published: April 24, 2024 09:51 PM2024-04-24T21:51:59+5:302024-04-24T21:53:06+5:30
यावेळी चार टेम्पाेसह ७० म्हशी एकूण ४६ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रेणापूर (जि. लातूर) : चाेरट्या मार्गाने वाहनातून पशुधनांची वाहतूक करणाऱ्या आठ जणांना रेणापूर पाेलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. यावेळी चार टेम्पाेसह ७० म्हशी एकूण ४६ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, रेणापूर ते आष्टामोड जाणाऱ्या मार्गावरील खराेळा येथील संभाजी चौकात नळेगाव येथील पशुधनाच्या बाजारातून कत्तलीच्या उद्देशाने लाल रंगाच्या मोठ्या चार टेम्पाेत म्हशी काेंबून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पाेलिसांनी ही वाहने आडवून झाडाझडती घेतली असता, यामध्ये मोठ्या प्रमाणावर पशुधना असल्याचे आढळून आले. यावेळी (एम.एच. ४८ ए.वाय. ०९४४), (एम.एच. १४ ए.जे. ०१०६), (एम.एच. ३३ टी. ३१२६), आणि (एम.एच. ४३ यू. ९८७५) या चार टेम्पाेची झाडाझडती घेत त्यातून जवळपास लहान ७० आणि चार मोठ्या म्हशी असा एकूण ४६ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात बालाजी डप्पडवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन टेम्पाेचालक उस्मान खैरोद्दीन डफेडर (३८, रा. आरगाव ता. जामखेड जि. अहमदनगर), शेख सलमान शेख रऊफ (२७, रा. बोरगाव ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर), शेख सलीम शेख सुलतान (२४, रा. सिल्लोड जि. संभाजीनगर), अबुझरी कुरेशी सैंदीक कुरेशी (३५ रा. जामखेड), साजिद कुरेशी (रा. जामखेड), वसीम कुरेशी ऊर्फ वसीम आयुब शेख (रा. सिल्लोड), जाकीर पटेल सुबान पटेल (रा. सिल्लोड) तसेच अब्बास गुलपाह शहा (रा. बोरगाव ता. सिल्लोड) यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेउपनि. सचिन रेडेकर हे करीत आहेत.