घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:15 AM2021-07-21T04:15:00+5:302021-07-21T04:15:00+5:30

ट्रकची दुचाकीला धडक; एक जण जखमी लातूर : भरधाव वेगातील एमएच २४ जे ८४९९ या क्रमांकाच्या ट्रकने समोरून येणाऱ्या ...

Two-wheeler lamps parked in front of the house | घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी लंपास

घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी लंपास

Next

ट्रकची दुचाकीला धडक; एक जण जखमी

लातूर : भरधाव वेगातील एमएच २४ जे ८४९९ या क्रमांकाच्या ट्रकने समोरून येणाऱ्या एमएच २४ बीजे १३३७ या क्रमांकाच्या दुचाकीला लातूर ते बार्शी रोडवर रामेगाव पाटीनजिक धडक दिली. याबाबत ट्रकचालकाविरुद्ध गातेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी रमेश गुणवंत हुडे दुचाकीवरून येत असताना लातूर ते बार्शी रोडवरील रामेगाव पाटीजवळ भरधाव वेगात समोरून आलेल्या एमएच २४ जे ८४९९ या क्रमांकाच्या ट्रकने जोराची धडक दिली. यात फिर्यादी जखमी झाले असून, मोटारसायकलचे नुकसान झाले आहे. त्यावरून गातेगाव पोलिसात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जुन्या कलेक्टर ऑफिसजवळून दुचाकी लंपास

लातूर : शहरातील जुन्या कलेक्टर ऑफिसनजिक असलेल्या रजिस्ट्री कार्यालयासमोर पार्किंग केलेल्या एमएच २४ एए ५९४४ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली. याबाबत सौदागर बाबूराव कापसे यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. घारोळे करीत आहेत.

किरकोळ कारणावरून मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा

अहमदपूर : तू मला शिवीगाळ का करतोस, असे विचारले असता, एकाला मारहाण झाल्याची घटना अहमदपूर येथील एका हॉटेलमध्ये घडली. याबाबत तिघांविरुद्ध अहमदपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अहमदपूर येथे जेवण करीत असताना विनाकारण बोलत फिर्यादीला शिवीगाळ झाली. याबाबत विचारणा केली असता, तिघांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, तसेच बाटलीने डोक्यात मारून जखमी केले, असे अमोल माधव शिवपुजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर रावसाहेब फड व अन्य दोघांविरुद्ध अहमदपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोउपनि. जाधव करीत आहेत.

दुचाकीला पाठीमागून धडक

लातूर : औसा ते भादा जाणाऱ्या रोडवर एमएच २४ वाय २१०१ या क्रमांकाच्या दुचाकीवरून शेताकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एमएच २४ बीबी ७८३४ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाने जोराची धडक दिली. या अपघातात फिर्यादीला मार लागला आहे. याबाबत संतोषसिंह विजयसिंह दीक्षित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच २४ बीबी ७८३४ या क्रमांकाच्या दुचाकीचालकाविरुद्ध औसा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉं. गिरी करीत आहेत.

प्लॉटच्या कारणावरून शिवीगाळ

लातूर : अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथे लॉटच्या करणावरून फिर्यादी अयुबखाँ चाँदखा पठाण (रा. हडोळती) यांना शिवीगाळ झाल्याची घटना घडली. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास विठ्ठल यादव व अन्य चौघांविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. डक करीत आहेत.

Web Title: Two-wheeler lamps parked in front of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.