जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढल्याने उकाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:18 AM2021-05-15T04:18:27+5:302021-05-15T04:18:27+5:30

हरंगुळ (खु.) येथे जयंती उत्साहात साजरी लातूर : तालुक्यातील हरंगुळ (खु.) येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात ...

Ukada due to increase in temperature mercury in the district | जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढल्याने उकाडा

जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढल्याने उकाडा

Next

हरंगुळ (खु.) येथे जयंती उत्साहात साजरी

लातूर : तालुक्यातील हरंगुळ (खु.) येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दीपक झुंजे-पाटील, विशाल झुंजे-पाटील, अजय झुंजे, शुभम भुजबळ, मनोहर भुजबळ, अमिर शेख, सतीश झुंजे, कार्तिक स्वामी आदींसह नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करत जयंती साजरी करण्यात आली. दीपक झुंजे-पाटील यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम राबवत जयंती साजरी करण्यात आली.

पथदिवे बंदमुळे नागरिकांची गैरसोय

लातूर : पाच नंबर चौक ते महिला तंत्रनिकेतन रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार पसरत आहे. परिणामी, वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पथदिवे दुरुस्त करण्यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. पथदिवे तत्काळ सुरू करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून मनपाकडे केली जात आहे.

खरीप हंगामाच्या कामांना आला वेग

लातूर : जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाच्या कामांना वेग आला आहे. नांगरणी, मोगडणी आदी कामे सुरू आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांचा वापर करावा, यासाठी कृषी विभागाच्या वतीने जनजागृती मोहीम राबविली जात आहे. यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने चांगले उत्पादन होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. जिल्ह्यात सोयाबीनला पसंती आहे.

साळे गल्ली येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

लातूर : शहरातील साळे गल्ली येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रामभाऊ जवळगे, ॲड. दिलीप तिगिले, बालाजी शिदोरे, सिद्धेश्वर मोरलावार, गोपीचंद घोडके, आशिष तिगिले, पवन जवळगे, शुभम शिदोळे, बालाजी मोरलावार, प्रसाद घोडके, गोविंद तिगिले, राजू बिराजदार आदींसह व वक्रतुंड गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रामभाऊ जवळगे आणि ॲड. दिलीप तिगिले यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने लातूर शहरासह जिल्ह्यात घरोघरी महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ॲड. दिलीप तिगिले यांनी कोरोनाच्या या संकटकाळात प्रत्येकांनी एकमेकांना मदत करावी, उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन केले.

Web Title: Ukada due to increase in temperature mercury in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.