...
तळणी शाळेत अभिवादन कार्यक्रम
औसा : तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सत्यप्रकाश भोसले होते. यावेळी भाग्यश्री पवार, सागर प्रताळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांतनर सहशिक्षिका कविता राठोड यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी एस.एम. कोळसुरे, आर.बी. हादवे, के.डी. राठोड, एस.एम. गिरी, रवि कुरील आदी उपस्थित होते.
...
शहीद भगतसिंग महाविद्यालयात कार्यक्रम
किल्लारी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती येथील शहीद भगतसिंग महाविद्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. संग्राम मोरे, डॉ. दैवशाला नागदे यांची उपस्थिती होती. यावेळी डाॅ. नागदे म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षण खुले केले. शिक्षणातून महिलांचा सर्वांगीण विकास होत आहे. महिलांनी समाजातील अनिष्ट प्रथांचा त्याग करावा. सूत्रसंचालन रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.अशोक गायकवाड यांनी केले. प्रा.डॉ. देवीदास भोयर यांनी आभार मानले.