कोरोना नियमांचे उल्लंघन; ३६ खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:18 AM2021-05-15T04:18:41+5:302021-05-15T04:18:41+5:30
क्वारंटाईन शिक्के अन् सॅनिटायझरही नाही प्रवासी उतरल्यावर त्यांच्या हातावर क्वारंटाईन शिक्के मारणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांना विलगीकरण बंधनकारक ...
क्वारंटाईन शिक्के अन् सॅनिटायझरही नाही
प्रवासी उतरल्यावर त्यांच्या हातावर क्वारंटाईन शिक्के मारणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांना विलगीकरण बंधनकारक आहे. तसेच ट्रॅव्हल्समध्ये मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, थर्मल गन आवश्यक असताना तेही आढळून आले नाही. अनेकांकडे व्यक्तिगत परवानगीही नव्हती. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांच्या सूचनेनुसार तीन दिवसांत ३६ ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी दिली.
२५ ट्रॅव्हल्स परत पाठविल्या
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पथकाने ट्रॅव्हल्स चालकांकडून लेखी घेतले. तसेच जेथून प्रवासी भरून आले होते, त्यांना त्या गावात परत पाठविण्यात आले. अशा एकूण २५ ट्रॅव्हल्सना परत पाठविण्यात आल्याची माहिती पथकाने दिली.