शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
2
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
3
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
4
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
5
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
6
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
7
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
8
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
9
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
10
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
11
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
12
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
13
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
14
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
15
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
16
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
17
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
18
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
19
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
20
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान

पाण्याचे स्रोत अटले; पावसाअभावी ऊसाची होतेय वैरण, तेलबिया वाण नामशेष होण्याची भीती

By संदीप शिंदे | Published: July 14, 2023 7:37 PM

औशात पाण्याची स्थिती बिकट; काळे ढग आणि वारे असल्याने शेतकरी हवालदिल

औसा : जून महिना संपला, जुलैचा मध्यावधी आला तरीदेखील औसा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाच्या ४५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहे. ज्यांनी पेरण्या केल्या त्या शेतकऱ्यांना पिके कशी वाचवावी याची चिंता आहे. दररोज आकाशात काळे ढग आणि सुसाट वाऱ्याने शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. बहुतांश पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडल्याने फडातल्या उसाचे पाचट झाले असून, त्याची वैरण करून जनावरांना टाकण्यात येत आहे. परिणामी तालुक्यातील स्थिती बिकट झाली आहे.

औसा तालुका मागासलेला तालुका असून दरवर्षी पर्जन्यमान कमीच होते. यासह या भागात धरण, मोठे तलाव, उपसा सिंचनामुळे ओलिताखाली क्षेत्र वाढेल, असा पर्यायच नसल्याने सततच दुष्काळांशी झुंज द्यावी लागते. पाऊस चांगला झाला तरच शेती अन्यथा सर्वत्र वाळवंट असते. यंदा तर स्थिती बिकट असून पावसाळा सुरू होऊन ४० दिवस झाले, दोन नक्षत्र कोरडीच गेली आहेत. आतापर्यंत तालुक्यात ७० मि.मी. पाऊस झाला. तो गतवर्षीच्या तुलनेत निम्माच असल्याने यावर्षीही शेतकऱ्यांचे वार्षिक अंदाज चुकताना दिसत आहे. एकरी १० हजारांचा खर्च करून कमी पावसावरच ५५ टक्के म्हणजेच ६१ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली. पण, त्यातही बहुतांश ठिकाणी बियाणे उगवण झाली नाही. यंदा सर्वाधिक ९० टक्के पेरा सोयाबीनचा असून मूग व उडिदाच्या पेऱ्यात कमालीची घट झाली. जुलैचा मध्यावधी उजाडला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे. बहुतांश जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा असून, शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

भुईमुगासह तीळ, सूर्यफूल नामशेष?तालुक्यात सध्या झालेल्या पेऱ्यामध्ये गळीत धान्यात समावेश असणाऱ्या भुईमूग, सूर्यफूल, तीळ आणि कारळे यांचा पेरा शून्य आहे. उर्वरित पेरणीत या पिकांचा समावेश होईल याची शाश्वती वाटत नसल्याने हे वाण नामशेष होतील? अशी भीती आहे. हे वाण स्वयंपाक घरातील महत्त्वाचे असून देखील १ लाख हेक्टर होणाऱ्या पेऱ्यात यांचा टक्का शून्य असल्याने ही चिंतेची बाब आहे.

तालुक्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या...२०१६ ते १८-१९ या वर्षांत अनुक्रमे ३५, ३३, ३१ शेतकऱ्यांनी दुष्काळ, नापिकी आणि सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. हा आकडा मराठवाड्यात सर्वाधिक होता. २०१५ पासून यात चढ-उतार आहेत. यात २०१५ मध्ये २७, २०१६-३५, २०१७-२३, २०१८-३१, २०१९-३३, २०२०-२४, २०२१-२१, २०२२-१२ आणि चालू वर्षात आतापर्यंत ०५ शेतकऱ्यांनी जीवन संपवले.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी