अवैध दारुविक्री विरोधात महिलांचा तुंगी ग्राम पंचायतमध्ये ठिय्या

By संदीप शिंदे | Published: June 26, 2023 06:49 PM2023-06-26T18:49:09+5:302023-06-26T18:49:21+5:30

तुंगी या पाच हजार लोकसंख्येच्या गावात अनेक ठिकणाी अवैध दारू विक्री सुरु आहे.

Women thiyya andolan in Tungi Gram Panchayat against illegal liquor sale | अवैध दारुविक्री विरोधात महिलांचा तुंगी ग्राम पंचायतमध्ये ठिय्या

अवैध दारुविक्री विरोधात महिलांचा तुंगी ग्राम पंचायतमध्ये ठिय्या

googlenewsNext

औसा : तालुक्यातील तुंगी (बु.) येथे अवैध दारु विक्रीचे प्रमाण वाढल्याने तरुण, नागरिक व्यसनाच्या आहारी जात आहेत. वेळोवेळी निवेदने देऊनही दारुबंदी होत नसल्याने संतप्त शेकडो महिलांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या मांडला. त्यामुळे सरपंचांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेऊन दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. याप्रसंगी महिलांनी गावातून रॅली काढत दारुविक्रीला विरोध केला.

तुंगी या पाच हजार लोकसंख्येच्या गावात अनेक ठिकणाी अवैध दारू विक्री सुरु आहे. त्यामुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायतमध्ये ठिय्या मांडत आपले कैफियत सरपंच, ग्रामसेवकासह उपसरपंचासमोर मांडून गावातील दारू विक्री बंद करण्याची मागणी केली. यावेळी सरपंच मोहन कावळे यांच्या अध्यक्षतेखाली दारुबंदीचा ठराव घेण्यात आला. प्रोसिडींग बुकवर नोंद घेण्यात आली. गावातील दारूबंद न झाल्यास आक्रोश मोर्चा पोलिस ठाण्यावर काढण्याचा इशाराही यावेळी महिलांनी दिला.

याप्रसंगी ग्रामसेवक एल.बी.पाटील, उपसरपंच बाजीराव जाधव, चांगभलं सेवाभावी संस्थेचे अध्यक्षा प्रा. सोनाली गुलबिले, शिवानी जाधव, कल्पना घोगरे, स्वाती चव्हाण, सरस्वती सुर्यवंशी, सुनिता सुर्यवंशी, तायरा शेख, विजयमाला, शेख, फतरु शेख, आदिनाथ कावळे, सचिन कावळे, शिवाजी सुर्यवंशी, अमोल कावळे उपस्थित होते.

Web Title: Women thiyya andolan in Tungi Gram Panchayat against illegal liquor sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.