वखार महामंडळाच्या वतीने कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:07+5:302021-09-02T04:43:07+5:30
कार्यशाळेस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, ...
कार्यशाळेस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, यांची उपस्थिती होती. यावेळी वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक के.आर. पवार यांनी उपस्थितांचा सत्कार करुन वखार महामंडळाची माहिती व कार्य शेतकऱ्यांना सांगितले. सूत्रसंचालन मकबूल शेख यांनी केले. कार्यशाळेस रेणापूर, औसा, शिरुर अनंतपाळ, उदगीर, चाकूर, अहमदपूर येथील शेतकरी उपस्थित होते. महामंडळाच्या वखार केंद्रावर शेतमाल साठवणुकीस शेतकऱ्यासाठी राखीव जागा, राज्यात गोदामांची उभारणी करुन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतमाल साठविण्यासाठी गोदामे उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना शेतमाल साठवणुकीवर ५० टक्के सवलत, शेतकऱ्यांना वखार पावतीवरील मालाच्या किमतीवर बँकेकडे तारण ठेवून ठेवीदारांना बँकेकडून त्वरित कर्ज, शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला बाजार भाव मिळवून देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, वखार केंद्रावर क्लिनिंग अँड ग्रेडिंग सुविधा यावर मार्गदर्शन करण्यात आले.