शहरी भागात शाळेत जाण्याचा रस्ता किती सहज आणि सोपा होता ना...? पण आज आम्ही तुम्हाला शाळेंचे असे काही जगभरातील खतरनाक रस्ते दाखणार आहोत, ज्याचा विचारही तुम्ही करु शकत नाहीत. या अतिशय कठीण रस्त्यांवरुनही ही मुलं रोज शाळेत जातात.
1) तुटलेला पूल, चिहेरंग नदी, लेबक, इंडोनेशिया
चीलंगकप गावातील ही मुलं रोज या तुटलेल्या पुलावरुन शाळेत जातात. या तुटलेल्या पुलाचा स्टीलचा रॉड पकडून त्यांना हा रस्ता क्रॉस करावा लागतो. आपला जीव मुठीत घेऊन रोज ही मुलं शाळेत जातात.
2) डोंगरातील एका फूटाच्या रस्त्यावरुन पाच तासांचा रस्ता, चीन
या परीसरातील शाळा डोंगरात इतक्या अडचणीच्या ठिकाणी आहे की, या मुलांना तब्बल पाच तासांचा खडतर प्रवास करुन जावं लागतं. धक्कादायक बाब म्हणजे या डोंगरातील हा खडतर मार्ग केवळ एक फूटाचा आहे. जराही तोल गेला तर मोठा अनर्थ होऊ शकतो.
3) टायरवरुन नदी ओलांडणारी शाळकरी मुले, फिलीपिन्स
येथील एका गावातील शाळकरी विद्यार्थी नदी क्रॉस करण्यासाठी टायरवर बसून रोज शाळेत जातात.
4) झाडांच्या मुळांचा रस्ता, भारत
हा फोटो भारतातीलच एका गावातील आहे. या गावातील मुलांना झाडांच्या मुळांपासून तयार झालेल्या रस्त्यांवरुन शाळेत जावं लागतं.
5) 30 फूट वर तुटलेल्या पुलांवरुन, इंडोनेशिया
या शाळकरी मुलांना एका नदीवरील 30 फूट उंचावर तुटलेल्या पुलावरुन जावं लागतं.
6) बर्फाने झाकलेल्या तुटल्या पुलावरुन..., चीन
चीनमधील एका भागात मुलांना पूर्णपणे बर्फाने झाकल्या गेलेल्या पुलावरुन जावं लागतं.
7) डोंगरातून रस्ता काढत जाणारी मुलं, चीन
या मुलांना रोज शाळेत डोंगरातून रस्ता नसलेल्या जागेतून जावं लागतं.