मुंबई : प्रेमाचं किंवा लग्नाचं नातं हे एकमेकांच्या विश्वासावर उभं राहतं. पण हे नातं टिकवण्यासाठी दोघांकडून प्रयत्न केले गेले पाहिजे. दोन व्यक्ती जेव्हा भेटतात, तेव्हा दोघांच्या सवयी या वेगवेगळ्या असतात. पण एकत्र आल्यावर दोघांमध्ये काही बदल अपेक्षीत असतात. पण ते होताना दिसत नाहीत. त्यामुळे मुलींना पुरुषांच्या काही गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्यातील काही खास गोष्टी खालीलप्रमाणे...
१. मुलींची नेहमी तक्रार असते की बॉयफ्रेंड त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मुली बोलत असतात त्यावेळी मुलाचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. पण मुलं जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांना असं वाटतं की, गर्लफ्रेन्डने त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे.
२. अनेक मुलींची ही तक्रार असते की, तिचा प्रियकर तिच्यासोबत वेळ घालवत नाही. अधिक वेळ तो इतर कामांमध्येच व्यस्त असतो किंवा मित्रांसोबत असतो. त्याचं कामच त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं.
३. जो व्यक्ती कोणतेही निर्णय एकटेच घेतो असा व्यक्तीही मुलींना आवडत नाही. त्यांना वाटतं की त्यांचा जोडीदार त्यांना कमी लेखतो.
४. काही पुरुष घरी आल्यानंतर लगेचच झोपतात. ही सवय महिलांना आवडत नाही. त्यांची इच्छा असते की पुरुषाने काही वेळ त्यांच्या सोबत प्रेमाच्या गोष्टी बोलल्या पाहिजे.
५. प्रत्येक महिलेला असं वाटतं की प्रियकर किंवा पतीने त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची प्रशंसा केली पाहिजे. पती जर दुसऱ्यांची स्तुती करत असेल तर ती महिलेला आवडत नाही.