सुंदरतेसोबतच मुलींनी या 7 गोष्टींनाही द्यावं प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 10:44 AM2018-04-03T10:44:58+5:302018-04-03T10:46:00+5:30
आजच्या काळातील मुलींना आणखी काही गोष्टींना सिरीअसली घ्यायला हवं. या गोष्टींमुळे तुमचं जगणं आणखी चांगलं होईल.
सुंदरता म्हटलं की मुली, मुली म्हटलं की सुंदरता हे समीकरण सर्वांनाच माहिती आहे. मुली सुंदर दिसण्यावर किती भर देतात हे सर्वांनाच माहिती आहे. त्यात गैरही काही नाहीये. पण त्यासोबतच आजच्या काळातील मुलींना आणखी काही गोष्टींना सिरीअसली घ्यायला हवं. या गोष्टींमुळे तुमचं जगणं आणखी चांगलं होईल.
1) आर्थिक स्थैर्य -
स्वत: गोष्टींसाठी स्वत: पैशांची बचत करा. याबाबत कुणावरही अवलंबून राहू नका. उगाच दहा वेळा तुम्हालाही कुणासमोर हात पसरावे लागणार नाही.
2) स्वप्नांचा पाठलाग -
समाजाने लादलेल्या बंधनांना झुगारुन आपली स्वप्न पूर्ण करण्यावर भर द्या. ते पूर्ण होणार नाहीत, असं स्वत:च ठरवून टाकण्याआधी निदान एकदा ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तरी करा.
3) खड्ड्यात गेली तडजोड -
समाजाने महिलांवर अनेक अलिखीत बंधनं लादली आहे. त्यानुसार महिलांनाच नेहमी त्याग करावा लागतो. याला नाही त्याला नाही...प्रत्येक गोष्टीसाठी मुलींनाच नाही ऐकावं लागतं. पण आता बस्स...
4) आपलं मत मांडा -
ब-याचदा मुली त्यांना काय वाटतं, त्यांचं एखाद्या गोष्टीवर काय मत आहे हे सांगतच नाहीत. पण तुम्हालाही स्वत:चं मत असलं पाहिजे. ते तुम्ही तितक्याच ताकदीने मांडलं पाहिजे. कारण तुम्हालाही तो आधिकार आहे.
5) आत्मविश्वास वाढवा -
कोणत्याही गोष्टीसाठी आत्मविश्वास हा महत्वाचा ठरतो. त्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढवा. हे जरा कठिण काम आहे. पण अशक्य नक्कीच नाहीये.
6) सकारात्मक विचार करा -
मी मुलगी आहे, त्यामुळे मी हे कसं करु शकणार असा विचार करु नका. मी काहीही करु शकते असा अॅटिट्यूड असू द्या. मोठा विचार करा.
7) स्वत:वर प्रेम करा -
बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही करालही. त्यासोबत आणखी एक महत्वाची बाब म्हणजे स्वत:वर प्रेम करा. जेव्हा तुम्ही स्वत:वर प्रेम कराल तरचं तुम्ही इतरही गोष्टी करु शकाल.